नाकाबंदीमध्ये पोलिसांकडून 10 चोरीच्या दुचाकी जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहारात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून नाकाबंदीत संशयित दुचाकीचे कागदपत्र तपासणे सुरु केल्याने गेल्या तीन दिवसात शहर पोलिसांना दहा दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. पैठण रोड, केंब्रिज शाळा चौक आणि रांजणगाव फाटा येथील वाहतूक पोलीस या कामासाठी मदत करत आहेत.

दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरत असलेल्या वाहनधारकांना नाकाबंदीदरम्यान अडवून पोलिसानी पैठण, भोकरदन, सदर बाजार, अंबड येथून वाहनांची चोरी करणाऱ्याना पकडले.

वेदांतनगर पोलिसांनी शेख रिझवान शेख करीम (21, रा. हुसैन कॉलनी ) ऋषिकेश बिसन जाधव (23, रा विशालनगर, वेदांतनगर ) यांना चौकशीदरम्यान अटक करून दहा दुचाकी जप्त केल्या ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, विवेक सराफ, सुरेश वानखेडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक जनार्दन साळुंके, सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Leave a Comment