Monday, February 6, 2023

पोलिसांकडून 500 गाड्या जप्त ः साताऱ्यात विनाकारण बाहेर पडणा-यावर कडक कारवाई

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्याची कोरोनाबधित सख्या वाढत आहे. किराणामाल, फळशेती, भाजीपाला असेल त्यांना पूर्णतः बंद करण्यात आले आहे. कालपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. सातारा शहरांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बाहेर येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई सुरू आहे.

- Advertisement -

लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी 500 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 500 गाड्यांचा समावेश असून फोर व्हीलर, टू व्हीलर जप्त करण्यात आलेल्या आहेत. जवळपास एक लाख 40 हजार पर्यंत दंड वसूल करण्यात आलेला आहे.

लोकांनी वैद्यकीय कारणाशिवाय लोकांनी रस्त्यावर येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार ः धीरज पाटील 

काल जास्त मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडताना पाहायला मिळत होती. कालच्या कारवाईमुळे आज थोडं कमी प्रमाण दिसत आहे. काही ना काही सांगत रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. विनाकारण बाहेर पडणा-यावर कायदेशीर कारवाई केली जाते आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो, त्यामुळे अशा दुहेरी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कृपया करून लोकांनी कुठल्याही कारणास्तव घराबाहेर येऊ नये असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 http://bit.ly/3t7Alba