दुकानावर छापा टाकून बेकायदेशीर रित्या साठवलेला 88 हजारांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिराळा तालुक्यातील चरण येथे एका दुकानात विक्रीस प्रतिबंध असलेला, बेकायदेशीर रित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी लक्ष्मण आनंदा डुबल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दुकानातून विमल, माणीकचंद गुटखा आणि सुगंधी तंबाखू असा एकूण ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शिराळा तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संकेत कानडे यांना माहिती मिळाली की, चरण येथे असणाऱ्या विजय किराण दूकानाच्या बाजुला लक्ष्मण डुबल हा विमल गुटखा, माणीकचंद गुटखा व सुगंधी तंबाखु विक्री करत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकून लक्ष्मण डुबल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस करता त्याने गिऱ्हाईकाचे मागणी असल्याने गुटखा विक्री करत असल्याचे सांगितले.

त्यावेळी त्याची झडती घेतली असता दुकानाच्या आडोशाला ठेवलेला ८८ हजार २३० रुपये किमतीचा विमल गुटखा, माणीकचंद गुटखा, सुगधी तंबाखु व कोल्हापुरी पानमसाल्याची पोती आढळली. सदरचा सर्व मुद्देमाल जप्त करून डुबल याच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment