व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

अहेरी : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीतील अहेरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. अहेरी येथील ‘प्राणहिता’ पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने गोळी झाडून आपल्या सासऱ्याची हत्या केली आहे. हि घटना धरमपुरी वार्डामध्ये रात्री 10 च्या सुमारास घडली. गोळी झाडणाऱ्या आरोपी शिपायाचे नाव मनोज गावडे असे आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हि भामरागड तालुक्यातील रहिवासी असून ते काल बुधवारी मुलीच्या घरी तिला भेटण्यासाठी आले होते. मृत व्यक्ती आरोपी शिपायाचा सासरा आणि सख्खा मामा होता. हि घटना घडली तेव्हा आरोपी शिपायाची पत्नी, मुले घरीच होती.

आरोपी शिपाई आणि मृत सासरा यांच्यात घरगुती वादातून बाचाबाची झाली आणि काही कळायच्या आत शिपायाने आपल्या सर्व्हिस रायफल मधून सासऱ्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.