सांगली च्या विकासकामांसाठी मुख्यमत्र्यांकडुन १०० कोटींची मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे

सांगली महापालिकेच्या शंभर कोटींच्या २६५ विकासकामांना अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे. मात्र ४६ कोटींच्या विकासकामांना कात्री लागली. शासनाकडून महापालिकेला ७० कोटी रूपये मिळणार असून उर्वरित ३० कोटींचे विशेष पॅकेज देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. स्थायी समितीची शुक्रवारी तातडीने सभा बोलाविण्यात आली असून स्थायीच्या मान्यनतेनंतर या कामांच्या तातडीने निविदा प्रक्रिया केल्या जातील, अशी माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली.

महापौर खोत म्हणाल्या, भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी व मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविले होते. त्यापैकी शंभर कोटींच्या २६५ कामांना मुख्यमंत्र्यांनी आज मान्यता दिली आहे. पाच वर्षात होणाऱ्या कामांचे प्रस्ताव १५ दिवसात पुर्ण केले. आचारसंहिता लागण्याची आधी निविदा काढण्यात येतील. त्यासाठी उद्याच स्थायी समितीची विशेष सभा घेऊन या कामांच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी घेण्यात येईल. शासनाने नगरोत्थानच्या नियमानुसार ७०-३० असा वाटा दिला आहे. त्यामुळे महापालिकेला ३० कोटी रुपये द्यावे लागणार होते. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ३० कोटीचा निधी विशेष निधीतून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. त्यासाठी 30 कोटींचा प्रस्ताव शासनाला देण्यात येणार आहे. तशी सूचना शासनाकडून आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

या शंभर कोटीमध्ये 178 रस्ते कामे, 69 रस्ते गटारीची कामे, 10 इमारती बांधकाम, 4 दहनभूमी, 3 ड्रेनेज तर 1 पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा समावेश आहे. महापालिकेने 146 कोटींचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी मुख्यमंत्र्यांनी आणखी शंभर कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. आणखी शंभर कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली आहे

Leave a Comment