पुतण्या राष्ट्रवादीवरील वर्चस्व वाढवत आहेत – मोदी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा प्रतिनिधी

    नरेंद्र मोदी यांनी वर्धा निवडणुकीच्या प्रचारसभेत शरद पवारांसह घराणेशाहीवर टीका केली. शरद पवारांचं पक्षात सध्या काही चालत नसून त्यांचा पुतण्या राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असून आजपर्यंत काँग्रेससह राष्ट्रवादी घराणेशाही पोसत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

    ते म्हणाले काँग्रेससह राष्ट्रवादी ही घराणेशाहीचं समर्थन करणारे पक्ष असून सत्ता एकमेकांच्या घरात सत्ता कशी जाईल याचाच विचार आजपर्यंत करत आले आहेत. दरम्यान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मी आलो आहे याचा मला या भूमीत सेवा करण्याची संधी तुम्ही दिलीत. त्यामुळे तुमचा आभारी.

   या भूमीत पाय ठेवताना अभिमान वाटत आहे. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीमध्ये चाललेल्या घराणेशाहीवर विशेषतः शरद पवारांवर जोरदार टीका केली. मावळ मधून पुतण्याच्या हट्टापायी त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला , तसेच स्वतः शरद पवार निवडणुकीतुन माघार घेतली आहे बहुतेक त्यांना वारा कोणत्या दिशेने जातोय हे कळलं असावं.