पाच आणि दहा रुपयांची नाणी मोजताना झाली अधिकाऱ्यांची पूर्ती दमछाक.
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
प्रसिद्धीसाठी कोण नेमकं काय करेल याचा काही नेम नाही. सातारचे अभिजित बिचकुले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आजही असच झालं सचिन बिचकुले हे मूळचे जरी सातारचे असले तरी त्यांनी आज चक्क सांगली मधून लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांनी जी अमानत रक्कम भरायची असते ती २५ हजार रुपयांची चिल्लर पिशवीतून आणली होती. पाच आणि दहा रुपयांची नाणी मोजताना मात्र अधिकाऱ्यांची पूर्ती दमछाक झाली होती.
अधिक माहीतीनुसार सचिन बिचकुले हे मूळचे साताऱ्याचे ते उच्च शिक्षित आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांनी चक्क उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. आणि त्यामध्ये त्यांचा पराभव हि झाला होता. आता तर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदार संघातून निवडणूक लढायचं निश्चित केलं आहे. त्यांची सासरवाडी सांगली म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभा राहिल्याचं सांगितलं. आज त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जी अमानत रक्कम भरायची असते ती चक्क दोन पिशव्या चिल्लर भरून आणली होती.
दहा आणि पाच रुपयांची चिल्लर घेऊन ते साताऱ्याहून सांगलीला आले होते. २५ हजार रुपये उमेद्वारी अर्ज रक्कम आहे बिचकुलेंच्या चिल्लरची रक्कम ही तब्बल १७ हजार रुपये होती. हा आगळावेगळा माणूस पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या माणसांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र या चिल्लर घेऊन आलेल्या माणसाची चर्चाच दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रंगली होती.