पक्षाला काडया करणारे कार्यकर्ते नको, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत – नितीन गडकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “पक्षाला इकडून तिकडे जाणारे,गटबाजी करणारे, काड्या करणारे लोकं नको तर निष्ठावंत कार्यकर्ते हवेत, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते भाजपचे निष्ठवंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आनंदराव ठवरे … Read more

सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप सरकारच्या काळात नेत्यांच्या फोन टॅप केल्याचा गौप्यस्फोट केला होता. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भातील पुरावे गृहमंत्रालायकडे आल्यामुळेच कार्यवाही तातडीने करावी लागेल असं मत व्यक्त केलं. दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
#hellomaharashtra

भीमा कोरेगाव प्रकरणामागील सत्य बाहेर येईल या भीतीने तपास NIAकडे – शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणामागील सत्य बाहेर येईल या भीतीने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. तसेच अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे नक्षलवाद नव्हे असेही पवार म्हणाले. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. SIT चौकशीच्या मागणीनंतर पाच … Read more

R.R.पाटील यांच्यानंतर आता जयंत पाटील संभाजी भिडेंच्या बचावाला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर आर पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजपचं काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी केंद्राने NIA कडे सोपवल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले … Read more

‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य!

 राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि अयोग्य यांची जाण असलेला नेता, स्वतःचा करिश्मा असलेला नेता, चांगल्या साहित्याची, संगीताची समज असलेला नेता, राजकीय अपयशापोटी नैराश्येतून इतकं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. त्यांचं हे भाषण हीच त्यांची भविष्यातली राजकीय दिशा असेल तर ती त्यांच्यासाठी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘अयोध्या’वारीचा दिवस ठरला! या दिवशी करणार प्रयाण

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत जातील, ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यानुसार अयोध्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून येत्या ७ मार्चला मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय आहे. त्यात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान मोदींमुळे 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचा केंद्राचा निर्णय असंवैधानिक – बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : राज्य सरकारला विश्वासात न घेता भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय  असंवैधानिक असून राज्याच्या स्वायत्तेवर घाला घालण्याचा प्रकार आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची SIT चौकशी करण्यासाठी खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री … Read more

मोठी बातमी : केंद्र सरकारचा महाराष्ट्र सरकारला धक्का; भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे

मुंबई : शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशीची मागणी केल्यानंतर आता केंद्र सरकारने या प्रकरणात उडी घेतली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला चांगलाच धक्का दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे … Read more

शरद पवारांचा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांना नक्षलवाद्यांना वाचवायचं असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भीमा कारेगाव हिंसाचारवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. विनोद तावडे म्हणाले, “शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना … Read more