या १२ जागांवरून शिवसेना भाजपमध्ये आहे तणाव

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असले तरी शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने शिवसेनेला ११५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतू शिवसेना १२५ च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे १० ते १२ जागांवरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याचे समजते. त्यामुळेच युतीची अधिकृत घोषणा होण्यासही विलंब लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या … Read more

सांगली महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सत्ताधारी भाजप कडून मिरजेचे गणेश माळी व कुपवाडचे गजानन मगदूम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता सभापतीपदाचा निर्णय बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या या घडामोडीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी नजर ठेवली आहे. नाराजीचा फायदा उठविण्याच्या तयारीत आघाडीचे नेते आहेत. महापालिकेच्या स्थायी … Read more

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर ; यादीत २२ जागांचा समावेश तर जातीचाही उल्लेख

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत देखील लोकसभा उमेदवारांच्या यादी प्रमाणे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर एमआयएम सोबत पुन्हा संधान नबंधता विधानसभेच्या सर्व जागा वंचित लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. एमआयएमने वंचित सोबत काडीमोड घेतल्यानंतर आपने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित … Read more

Breaking| शिवस्मारकाच्या कामात घोटाळा ; काँग्रेस राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई प्रतिनिधी | शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहार या बाबत कॅगच्या अधिकाऱ्याने तक्रार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. स्मारकाची एक विट देखील नरचता स्मारकासाठी ८० कोटी रुपये खर्च कसे झाले. … Read more

संजय राऊत यांनी निर्थक वक्तव्य करू नयेत : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निरर्थक वक्तव्य करू नये. युतीसंदर्भातील बोलणी दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे.  २०१४ ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही … Read more

नारायण राणेंच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात

मुंबई प्रतिनिधी| नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार अशा चर्चा मागील काही दिवसापासून सतत सुरु आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेना विरोध करेल असे बोलले जाते आहे. मात्र शिवसेना मवाळ भूमिकेत असल्याने राणेंचा भाजप प्रवेश होईल असे बोलले जाते आहे. याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांना भाजपमध्ये … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का : काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पुत्र प्रताप व मानसिंग तसेच पुतण्या सुनील पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण?

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांना चोख प्रतित्तर देण्याचे ठरवले असून यासाठी राष्ट्रवादी नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र ठरणार … Read more

लोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी लढणार नाही, उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली असल्यचे बोलले जात आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारिखही पक्की झाली असून विधानसभेसोबतच होणार्‍या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोण निवडणुक लढणार हे अजून गुलदस्त्यात आहे. अशात आता शरद पवार जर लोकसभेसाठी उभे राहिले तर मी निवडणुक … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेची ‘ही’ आहे भूमिका

मुंबई प्रतिनिधी| सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. घोषणेनंतर शिवसेनेची भूमिका नेमकी काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला ही जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र शिवसेनेने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत घोषित झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपची निवडणुकीच्या संदर्भाने लगबग सुरु … Read more