उस्मानाबादमध्ये हाय होल्टेज ड्रामा ;शिवसेना खासदारानेच ओमराजेंच्या विरोधात दाखल केला गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,

उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हाय होल्टेज ड्रामा रंगत आल्याचे चित्र आहे. कारण शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमराजे यांच्या व्हायरल क्लीपप्रकरणी खासदार रवींद्र गायकवाड यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कलम ६५, ६६, ६७  आणि आयपीएसीच्या ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये ओमराजे यांनी अश्लील भाषा वापरून शिवीगाळ आणि चारित्र्य हनन केल्याचा आरोप आहे.

रवींद्र गायकवाड हे उस्मानाबादमधून शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, यंदा शिवसेनेने रवींद्र गायकवाड याचं तिकीट कापलं आणि दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड नाराज आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत प्रयत्न करुन पाहिले. मात्र, त्यांना तिकीट मिळालंच नाही. ओमराजे निंबाळकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला. उस्मानाबादमधील शिवसेनेतील वाद गेल्या काही दिवसात वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र गायवाड विरुद्ध ओमराजे निंबाळकर या वादाचा फायदा रणाजगतीसिंह पाटील यांना होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्वाच्या बातम्या

धक्कादायक ! वीज कोसळून ४० शेळ्या आणि दोन मेंढपाळ जागीच ठार

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा

उदयनराजेंना टोलापिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

Leave a Comment