सोशली उतावीळ बहाद्दरांचा बंदोबस्त करणार – विश्वास नांगरे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आक्षेपार्ह आणि चुकीच्या पोस्ट पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई होणार..

नाशिक प्रतिनिधी | बिकन शेख 

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असूनही व्हॉट्सअप, फेसबुकवर राजकीय शत्रूंकडून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. यासोबतच राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींवर अनेक जोक्स व्हायरल केले जात आहेत. मात्र आता यावर पोलिसांचं लक्ष राहणार आहे.

यासाठी विशेष सायबर सेल कार्यन्वित करण्यात आला असून अशाप्रकारे आक्षेपार्ह आणि चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. निवडणुकांचा बिगुल वाजला असून अनेक पक्षांच्या उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत प्रचार केला जात असल्याचं सध्या बघायला मिळत आहे.

मात्र यासोबतच अनेक राजकीय शत्रूंकडून याच माध्यमातून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात असून सोशल मीडियाचा एकप्रकारे गैरवापर केला जात आहे. त्यामुळे अशा पोस्ट कोणाच्या निदर्शनास आल्यास सायबर पोलिसांना कळवा असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.

Leave a Comment