हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा (IPL) माहौल सध्या संपूर्ण देशात बघायला मिळतोय. भारतात क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानत असल्याने सामने बघण्यासाठी मैदाने एकदम खचाखच भरत आहेत. आयपीएल मध्ये एकूण १० संघ असून प्रत्येक संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. कोणी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतोय, कोण चेन्नईला सपोर्ट करतोय तर कोणी विराट कोहलीच्या आरसीबीचा फॅन आहे…परंतु विचार करा? जर राजकारणी मंडळी आयपीएल खेळत असती तर? कोणता नेता कोणत्या संघाचा कॅप्टन असता? चिंता करू नका, AI ने काम सोप्प केलंय. आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे AI ने काही फोटो बनवले आहेत… ज्यामध्ये राजकारणी नेते वेगवेगळ्या आयपीएल जर्सी मध्ये दिसत आहेत.

या AI फोटोमध्ये, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात टायटन्स संघाची जर्सी परिधान केलेले दिसत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान मोदी हे मूळ गुजरातचे आहेत. गुजरातपासूनच त्यांचं राजकारण सुरु झालं… आज जरी त्यांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीतील सत्ता काबीज केली असली तरी त्यांचं मूळ गाव हे गुजरात आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हाती एका एआय आर्टिस्ट आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कमान सोपवली आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्ली कॅपिटलच्या जर्सीत दिसत असून त्यांच्या हातात बॅट आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि आक्रमक नेत्या ममता बॅनर्जी यांच्याकडे कोलकाता नाईट रायडर्स या संघाची धुरा आहे. ममता बॅनर्जी आणि कोलकाता हे कधीही न तुटणार समीकरण आहे. कोलकात्यात त्यांचा असलेला एकूण प्रभाव बघता AI ने सुद्धा त्यांच्याकडेच कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व दिल आहे.

उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हाती लखनौ सुपरजाईंट संघाची कमान आहे. लखनौ सुपरजायंट्स हि उत्तर प्रदेशची होम टीम आहे. आणि योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे AI ने त्यांना लखनौ सुपर जाईंटची जर्सी घातली आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात अपयशी टीम असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूची धुरा AI ने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडे सोपवली आहे. आरसीबीच्या जर्सीमध्ये, राहुल गांधी दोन्ही हातात कप धरलेले दिसत आहेत. पण आरसीबीला आजपर्यंत एकही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही हि बाब वेगळी.

एआय ने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग यांच्याकडे पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व सोपवलं आहे. भगवंत सिंग मान यांनी पंजाबची जर्सी घातलेली दाखवली आहे. या चित्रात भगवंत सिंग मान गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत.

या एआय फोटोमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या हातात बॉल दिसत आहे.

आयपीएल इतिहासातली सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन दाखवले गेले आहेत. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे, म्हणून AI ने एमके स्टॅलिनला सीएसकेचा कर्णधार केलं आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना एआयने राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये दाखवले आहे AI ला असं वाटतंय कि अमित शाह जर आयपीएल खेळले असते तर ते राजस्थान रॉयल्स संघाचा भाग झाले असते.

या एआय फोटोमध्ये, तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीमध्ये दाखवले आहे. केसीआर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी तेलंगण आहे, त्यामुळे एआयने त्यांना सनरायझर्स हैदराबादसंघाचा भाग बनवले आहे.