पाकिस्तानमध्ये दारिद्र्यामुळे वाईट परिस्थिती ! 40 टक्के लोकांच्या घरात अन्नटंचाई, जागतिक बँकेने जाहीर केला अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पाकिस्तानची परिस्थिती सध्या बिकट आहे. अर्थव्यवस्था ढासळत आहे तसेच गरिबी (poverty in pakistan) देखील वाढत आहे. देशातील अन्न आणि रोजगाराचे संकटही तीव्र होत आहे. जागतिक बँकेच्या अहवालात हे उघड झाले आहे. जागतिक बँकेचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानमधील 40 टक्के कुटुंबे अन्नटंचाईमुळे त्रस्त आहेत. लोकांना अन्न मिळवण्यात त्रास होत आहे. येथे काम करणार्‍यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

सन 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये दारिद्र्य 4.4 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे जागतिक बँकेचे मत आहे. येथे 20 लाखाहून अधिक लोकं दारिद्र्य रेषेच्या खाली गेले आहेत. पाकिस्तान सध्या दारिद्र्याच्या टप्प्यातून जात आहे आणि देश चालविण्यासाठी इम्रान सरकारने IMF शिवाय अनेक देशांकडूनही कर्ज घेतले आहे. आता IMF च्या दबावामुळे पाकिस्तानने स्वतःच्या लोकांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे.

अहवालात खुलासा केला आहे
न्यूज इंटरनॅशनलच्या अहवालात म्हटले आहे की, निम्न-मध्यम-उत्पन्न दारिद्र्य दराचा वापर करून, जागतिक बँकेने 2020-21 मध्ये पाकिस्तानमधील दारिद्र्याचे प्रमाण 39.3 टक्के आणि 2021-22 मध्ये 39.2 टक्के असल्याचा अंदाज लावला आहे. तर 2022-23 मध्ये हेच प्रमाण 37.9 टक्के असू शकते.

गरीबी 78.3% पर्यंत पोहोचू शकते
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार 2020-21 मध्ये दारिद्र्य 78.4 टक्के होते आणि 2021-22 मध्ये ते 78.3 टक्के होईल. सन 2022-23 मध्ये ते 77.5 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.

कोरोना संकटाच्या भीषण परिस्थिती
जागतिक बँकेचे म्हणणे आहे की, जगभरातील कोरोना संकटामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या काळात काम करणार्‍या लोकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. याशिवाय रोजगाराची सर्वात मोठी कमतरता अनौपचारिक आणि कामगार वर्गात दिसून आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, दरडोई देशात दरडोई सरासरी वाढ केवळ दोन टक्के आहे. ही आकडेवारी दक्षिण आशियाच्या सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment