हार्ट अ‍ॅटॅकमुळे ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन यांचेहार्ट अ‍ॅटॅकमुळे गुरुवारी निधन झाले आहे. ते ४८ वर्षांचे होते. त्यामुळे दाक्षिण भारतीय चित्रपसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये केआर सच्चिदानंदन हे सैची या टोपण नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिलेली होती.

टाइम्स नाउने दिलेल्या एका बातमीनुसार सच्चिदानंद यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना १६ जून रोजी केरळ येथील त्रिसूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते आयसीयूमध्येच होते. मात्र गुरुवारी रात्री त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सच्चिदानंदन यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

 

२००७ मध्ये केआर सच्चिदानंदन यांनी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरला सुरुवात केल्याचे म्हटले जाते. सुरुवातीला त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केले होते. अभिनेता पृथ्वी सुकुमारनसोबत त्यांनी ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment