सोशल मिडियावर अश्लिल मेसेज : बनावट अकाऊंटने युवतीची बदनामी करणारास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | एका तरुणीच्या वडीलांचा मोबाईल गहाळ झालेवर सदर मोबाईल हा अज्ञात इसमास सापडेलवर त्यांने सदर मोबाईलचा वापर करुन मोबाईलमध्ये असले व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्टाग्राम व टेलीग्राम या सोशल मिडीयावरील अंकाऊटवरुन तसेच तरूणीचे फेसबुक / इन्स्ट्राग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावरुन अश्लील मेसेज व व्हिडिओ प्रसारीत करून बदनामी केले प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अमोल संपत बाबर (वय- 26 वर्षे, रा. शहापूर ता. कराड जि. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव असून त्यास अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 13 जानेवारी रोजी एका तरूणीने वडिलांचा मोबाईल गहाळ झाला असल्याची फिर्याद दिली होती. ज्याला हा मोबाईल सापडला त्याने फेसबुक / इन्स्ट्राग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावरुन अश्लील मेसेज व व्हिडिओ प्रसारीत करून बदनामी केले प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहुन पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सायबर पोलीस ठाणे, सातारा यांनी तपासाची सुत्रे गतीमान करुन गुन्हयातील तांत्रिक माहिती प्राप्त करुन सदर माहितीचे तंत्रशुध्द पध्दतीने विश्लेषण करुन संशयित आरोपी निष्पन्न करुन त्यास जेरबंद केले. तसेच त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे नमुद गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची इतःभूत माहिती तपास पथकास दिली आहे.

सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) मुख्यालय सजन हंकारे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांचे मार्गदशनाखाली सफौ. महेश शेटे, पोहेकॉ. शंकर सावंत, पोहेकॉ. सचिन पवार, पोना. अमित झेंडे, पोना. संदिप पाटील, मपोना काकडे यांनी कारवाईमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. या कारवाईव्दारे सातारा सायबर पोलीसांनी फेसवुक, इन्स्ट्राग्राम, व्हॉटस अॅप व सोशल मिडीयाचे सहाय्याने गुन्हे करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही असा संदेश दिला आहे.

Leave a Comment