हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Portable Washing Machine : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक गोष्टी सहजपणे केल्या जात आहेत. अगदी जेवण बनवण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंतच्या अनेक कामांसाही अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येकालाच त्याचा लाभ घेता येईलच असे नाही. आता हिवाळा देखील आला आहे. ज्यामुळे वॉशिंग मशीनची मागणी वाढते आहे. बाजारात मागणी वाढल्यामुळे वॉशिंग मशीनच्या किंमती देखील वाढतात. मात्र जर आपल्या घरात कमी लोकं असल्यामुळे आपण कमी किंमतीच्या वॉशिंग मशिनच्या शोधात असाल तर आजची हि बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण अगदी बादलीसारख्या दिसणाऱ्या Portable Washing Machine बाबतची माहिती जाणून घेणार आहोत…
बादलीच्या आकारची वॉशिंग मशीन
अगदी बादलीसारख्या दिसणाऱ्या या मशीनचे नाव आहे Hilton 3 kg Semi-Automatic Top Loading Washing Machine असे आहे. या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची (Portable Washing Machine) क्षमता 3KG आहे. ज्यामध्ये एकाच वेळी 5 ते 6 कपडे धुता येतील. तसेच यामध्ये एक स्पिनर अटॅचमेंट देखील देण्यात आला आहे, ज्यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होईल. यासोबतच ऑटोमॅटिक ऑफची सुविधा देखील दिली गेली आहे. जी प्लग इन करून सहजपणे वापरता येईल.
या Portable Washing Machine ची किंमत जाणून घ्या
या वॉशिंग मशीनमध्ये ड्रायर बास्केट देण्यात आला आहे. ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. मात्र, ऑनलाईन शॉपिंग कंपनी असलेल्या Amazon वरून एका ऑफरमध्ये ती 4,590 रुपयांमध्ये मिळू शकेल. तसेच यामध्ये 10 मिनिटांतच कपडे धुतले जात असल्यामुळे पाणी आणि विजेची बचत देखील होईल. हे लक्षात घ्या कि,स्थानिक बाजारापेठेतही ही पोर्टेबल वॉशिंग मशीन मिळू शकेल. कदाचित त्याचे डिझाईन ऑनलाईन मिळणाऱ्या Portable Washing Machine पेक्षा थोडे वेगळे असू शकेल, मात्र असे असले तरीही ते अगदी त्याच मशीन प्रमाणे काम करेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Hilton-Semi-Automatic-Loading-Washing-HIMW-300/dp/B07B2TXW55
हे पण वाचा :
Jandhan Account : जनधन खातेधारकांना झिरो बॅलन्सवरही मिळेल 10,000 रुपयांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Travel Insurance : रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवले किंवा चोरीला गेल्यावरही करता येतो क्लेम, जाणून घ्या त्याविषयीचे नियम