मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून रेल्वे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी अधिक गर्दी होते तिथे चोख बंदोबस्त करण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अँटिसॅबटॉजची टीम, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, स्थानिक पोलीस ठाणी आणि अतिरेकीविरोधी विभागालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त आणि प्रवक्ता उपायुक्त चैतन्य यांनी मुंबईकरांना केले आहे.

Leave a Comment