रोहित पाटलांकडे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सर्व विरोधकांना अस्मान दाखवत एकहाती राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणणारे आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना आता पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे समजत आहेत. रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चानी सध्या जोर धरला आहे.

अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत तब्बल 10 जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आणली. त्यानंतर रोहित पाटील यांना आणखी बळ देण्यासाठी तसेच रोहितवर  राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच  युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

रोहित यांचे वडील दिवंगत आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे यशस्वी पणे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिले होते. आबांच्या नंतर आता तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे  उद्योन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.