लवकरच पाहता येणार मोबाईलवर विना इंटरनेट TV; जाणून घ्या कधी सुरु होणार D2M सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आता तुम्ही विना इंटरनेट देखील टीव्ही (TV) पाहू शकता. यामध्ये वायफाय अ‍ॅण्टीण्याचे काम करणार असून लवकरच तुम्ही मोबाईलवर टीव्ही देखील पाहू शकता. सीएनबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार सरकार यासाठी काही मानके तयार करत आहे. या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर फ्री टू एअर चॅनेल्स पाहू शकता. यासाठी कंपन्यांना मोबाईलमध्ये मिडल विअर लावावे लागणार आहेत.यासाठी टेलिकॉम इंजिनिअरिंग सेंटरने ड्राफ्ट देखील जारी केला आहे. सरकार लवकरच डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट योजना तयार करत आहे. यासाठी दिल्ली एनसीआरमध्ये डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्टिंगवर एक पायलट स्टडी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूचना आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा यांनी दिली आहे. या माध्यमातून टीव्ही जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत जाण्यास मदत होणार आहे.

देशात 60 कोटीहून अधिक मोबाईल युजर्स
याविषयी अधिक बोलताना त्यांनी सांगितले कि सध्या देशात 20 कोटी घरांमध्ये टीव्ही (TV) आहे. याचबरोबर संपूर्ण देशात 60 कोटी मोबाईल युजर्स आणि 80 कोटी ब्रॉडबँड युजर्स आहेत. यामुळे टेलिव्हिजन मीडिया अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. यासंबंधी आयआयटी कानपूर आणि सांख्य लॅब्सने बंगलोरमध्ये डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्टिंगवर एक पायलट स्टडी केली आहे. आणि ते लवकरच नोएडा किंवा दिल्लीजवळ नवीन पायलट स्टडी सुरु करणार आहे.

काय आहे डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्टिंग
ज्या पद्धतीने डीटूच काम करते त्याच पद्धतीने डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्टिंग आहे. या माध्यमातून तुम्ही विना इंटरनेट मोबाईलवर टीव्ही (TV) पाहू शकता. एकप्रकारे हे रेडिओसारखे काम करणार आहे. यामध्ये ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी मिळून मोबाईलला स्थानिक डिजिटल टीव्ही मिळवण्यासाठी सक्षम केले जाते. या माध्यमातून मल्टीमिडीआयचे साहित्य थेट मोबाईलवरून प्रसारित केले जाते.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या