पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली खास योजना; केवळ व्याजातूनच मिळणार 30 हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल पुरुषांच्या तुलनेत महिलांचे बचत करण्यामध्ये प्रमाण जास्त वाढलेले आहेत. अनेक महिला थोडे का होईना पण भविष्यासाठी काही ना काही रक्कम बचत करून ठेवत असतात. या सगळ्यांमध्ये अनेक महिला या पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करत असतात. पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी अनेक विविध योजना आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही तसेच या योजनांमधून चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे अनेक लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अशीच महिलांसाठी एक खास योजना आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असे आहे.

काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये महिलांना व्याजदर आणि अधिक पैसा मिळवता येतो. ही योजना दोन वर्षासाठी असते. 2023 साली ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेतून महिलांना दरवर्षाला 7.5 टक्के एवढा व्याजदर मिळते. या योजनेमध्ये तुम्ही दोन वर्षांमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. ही योजना केवळ लहान मुलींसाठी आहे. ज्या मुलींचे वय दहा वर्ष किंवा दहा वर्षापासून पेक्षा कमी आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर भारतात राहणारी कोणतीही महिला या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

पोस्टाच्या या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये तुमचा टीडीएस कापला जात नाही. तसेच तुमचे व्याजदर 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत केले, तर तुम्हाला टॅक्स लागत नाही9. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. जर तुम्ही दोन वर्ष दोन लाखाची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 32 हजार 44 रुपये केवळ व्याजाचे मिळतील. आणि मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 2 लाख 32 हजार 44 रुपये मिळतील. म्हणजे या योजनेतून महिलांना चांगला फायदा होणार आहे.