Post Office Job| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत विविध पोस्ट कार्यालयांमध्ये एकूण 21,413 पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2025 पासून ते 3 मार्चपर्यंत अर्ज करावा. तसेच, सविस्तर माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचावे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Post Office Job)
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये उत्तीर्ण गुण आवश्यक आहेत. यासह उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असावी. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), तसेच दिव्यांग उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वय मर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि अर्ज शुल्क
इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया, अर्ज भरून सबमिशन आणि शुल्क भरणे अशा तीन टप्प्यांत पूर्ण करावी लागेल. यासह, जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 आहे. तर SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
निवड प्रक्रिया आणि वेतनश्रेणी
उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी मिळणार आहे. हे वेतन विविध पदांनुसार वेगळे असणार आहे.
अर्ज कसा करावा?
१) प्रथम indiapost.gov.in या वेबसाईटवर वर जा.
२) नंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
३) अर्जातील आवश्यक तपशील भरून सबमिट करा.
४) पुढे अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
५) शेवटी अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या.
अटी कोणत्या आहेत?(Post Office Job)
उमेदवारांकडे संगणकाचे प्राथमिक ज्ञान आणि सायकल चालवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस सेवांमध्ये हे कौशल्य महत्त्वाचे मानले जाते. या सर्व बाबी जाणून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.




