Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून देशभरातील नागरीकांसाठी अनेक योजना सुरु केल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच दुप्पट रिटर्न देखील मिळेल. पोस्ट ऑफिसच्या या जॉनचे नाव आहे किसान विकास पत्र. भारत सरकारची ही एक वन टाइम इन्वेस्टमेंट स्कीम आहे, ज्यामध्ये एका निश्चित कालावधीमध्ये आपले पैसे दुप्पट होतात. चला तर मग याबाबत सर्व काही जाणून घेउयात…

किसान विकास पत्र देशातील सर्व Post Office आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. त्याचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे. यामध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे.

Kisan Vikas Patra: निवेश को दोगुना करने की गांरटी देती है पोस्ट ऑफिस की यह स्कीम, जानिए क्या है प्रोसेस - Get Your Investment Doubled In Kisan Vikas Patra Scheme Know Full

कोणाकोणाला गुंतवणूक करता येईल ???

कमी 18 वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींना किसान विकास पत्र (KVP) मध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये सिंगल तसेच जॉइंट अकाउंटची सुविधा देखील आहे. त्याच वेळी, ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, ज्यांची देखरेख पालकांनी केली पाहिजे. ही योजना हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच HUF किंवा NRI व्यतिरिक्त इतर ट्रस्टसाठी देखील लागू असेल. या योजनेमध्ये कमीत कमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करता येतील. त्याच वेळी, जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. Post Office

Kisan Vikas Patra know money doubled in 118 month - News Nation

व्याज दर

किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणुकीवर सध्या 7 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये आपली गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. यामध्ये एक लाख रुपये एकरकमी गुंतवल्यास मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे. ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो काही रिटर्न येईल त्यावर टॅक्स आकारला जाईल. या योजनेमध्ये TDS कट केला जात नाही. Post Office

ट्रान्सफरची सुविधाही उपलब्ध

किसान विकास पत्र जारी केल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांनी कॅश केले जाऊ शकते. KVP एका Post Office मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रान्सफर केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केले जाऊ शकते. KVP मध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र हे पासबुकच्या आकारात जारी केले जाते.

किसान विकास पत्र योजना 2022: Kisan Vikas Patra, ब्याज दर, कैलकुलेटर, टैक्स बेनिफिट्स

‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत

या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, KVP अर्ज फॉर्म, एड्रेस प्रूफ आणि बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.unionbankofindia.co.in/english/kvp.aspx

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा