पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळतील 9250 रुपये; 5 वर्षे घेता येईल लाभ

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसच्या अनेक जबरदस्ती योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक योजना. (Post Office Monthly Income Scheme) भारत सरकारकडून चालवल्या जात असलेल्या या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते. या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा केले तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवलेले पैसे तुम्हाला 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मिळतील. अशा विविध कारणांमुळेच ही योजना लोकप्रिय ठरत आहे.

योजनेअंतर्गत दरमहा 9250 रुपये मिळतील

जर तुम्हाला एमआयएस योजनेतून दरमहा 9250 रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला संयुक्त खात्याद्वारे 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर 7.4 टक्के व्याजदराने तुम्हाला पाच वर्षांसाठी 9250 रुपये मासिक उत्पन्न मिळेल. परंतु जर तुमचे खाते संयुक्त नसेल तर तुम्हाला 9 लाख रुपये गुंतवता येतील. असे केल्यास तुम्हाला दरमहा 5550 रुपये मासिक उत्पन्न मिळेल.

तुम्हाला इतके व्याज मिळेल

मासिक योजनेअंतर्गत खाते 1 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पैसे भरून उघडता येते. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक एकल खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये करता येते. ज्यावर सरकार दरवर्षी 7.4 टक्के दराने व्याज देत आहे. खास म्हणजे, या योजनेमुळे दर महिन्याला तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीनुसार मासिक उत्पन्न दीले जाईल. यामध्ये जर तुम्ही पाच वर्षे पूर्ण व्हायच्या अगोदरच पैसे काढले तर तुमच्या मूळ रकमेतून 1 टक्के रक्कम कापली जाईल.