Post Office Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे अनेक तरुणांना फायदा झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ती म्हणजे आता पोस्ट ऑफिसकडून लवकरच एक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीबद्दलची अधिसूचना देखील जारी करण्यात येणार आहे. आता या भरती प्रक्रियाबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रिक्त पदे | Post Office Recruitment 2024
पोस्ट ऑफिसच्या या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती प्रक्रिया पोस्ट ऑफिसकडून राबविण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत 40 हजार रिक्त पदांसाठी भरती राबवण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यात या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहीर करण्यात येईल.
अर्ज पद्धती
पोस्ट ऑफिसकडून राबवण्यात येणारी ही भरती ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 18 ते 40 या वयोगटातील उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. इतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
शैक्षणिक पात्रता
पोस्ट ऑफिसच्या या भरती अंतर्गत दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्याचप्रमाणे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची सी देखील घेतली जाणार नाही.
अर्ज प्रक्रिया | Post Office Recruitment 2024
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, आणि तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.