Post Office Saving Schemes | प्रत्येक व्यक्ती हा आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या उत्पन्नातील काही ना काही भाग हा सेविंग करत असतो. जेणेकरून भविष्यात जर अचानक कोणतीही समस्या आली तर त्याला आर्थिक तरतूद करायला जास्त मेहनत करावी लागत नाही. आजकाल मार्केटमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भविष्यासाठी बचत करू शकता. त्यातून तुम्हाला चांगला परतावा देखील येतो. पोस्ट ऑफिसमध्ये देखील अशा अनेक सुरक्षित योजना आहेत. ज्या तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Saving Schemes) अनेक योजना ऑफर केल्या जातात. ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. ही एक लोकप्रिय सुरक्षित बचत करण्याची योजना आहे. यामध्ये तुमचे पैसे 100 टक्के सुरक्षित असतात आणि तुम्हाला त्यातून चांगला परतावा देखील मिळतो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही दर महिन्याला केवळ 100 रुपये निधी जमा करून भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या (Post Office Saving Schemes) या ठेव खात्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतात. या योजनेचा कालावधी ६० महिने एवढा आहे. म्हणजे साठ महिन्यापर्यंत तुम्हाला किमान 100 रुपये या खात्यात जमा करावे लागतात. 60 महिने पूर्ण झाल्यावर तुम्ही हे पैसे काढू शकता. हे पैसे तुम्हाला व्याजासह मिळणार आहेत. यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त खाती देखील उघडू शकता. तसेच दर महिन्याला कमीत कमी शंभर रुपये तुम्ही यामध्ये देऊ शकता. या योजनेमध्ये तुम्ही एकटे किंवा संयुक्तपणे तीन लोकांचे खाते उघडू शकता. तुम्हाला जर हे खाते चालवणे शक्य नसेल, तर तुम्ही तेच नंतर बंद देखील करू शकता.
या योजनेमध्ये जर तुम्ही 12 महिने दर महिन्याला पैसे जमा करत असाल आणि अचानक तुम्हाला कर्ज लागले, तर तुम्ही ते सहजपणे घेऊ शकता. कोणताही सामान्य नागरिक ज्येष्ठ, नागरिक, दहा वर्षाचे अल्पवयीन मुल, गरीब, श्रीमंत कोणताही भारतीय नागरिक या योजनेमध्ये त्यांचे खाते उघडू शकतो
या योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला जाऊन भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावी लागेल. या योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पास पोर्ट आकाराचा फोटो, जन्म प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्यानंतर पोस्टमध्ये तुमचे अकाउंट ओपन होईल.