हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकाल लोक सरकारी बँका आणि पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास जास्त कल दाखवत आहेत. कारण की, सध्या पोस्ट ऑफिस कमी मुदतीपासून दीर्घकाळापर्यंत गुंतवणुकीसाठी अनेक योजना आणि पर्याय उपलब्ध करून देत आहे. या योजना आकर्षक व्याजदरासह आर्थिक सुरक्षिततेचे देखील वचन देतात.
पोस्ट ऑफिसच्या खास योजना
‘नॅशनल सेविंग सर्टिफिकेट’ (NSC) योजना 5 वर्षांसाठी 7.7% व्याजदरासह आकर्षक परतावा देत आहे. तसेच, महिलांसाठी खास तयार केलेली ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ (MSSC) योजना 7.5% व्याजदर प्रदान करते. या योजनेचा लाभ 31 मार्च 2025 पर्यंत घेता येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाने ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ (SCSS) आणली आहे. निवृत्तीनंतरच्या काळासाठी तयार केलेल्या या योजनेत 5 वर्षांसाठी 8.2% व्याजदर मिळतो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास ज्येष्ठ नागरिकांना मदत होईल.
यासह‘किसान विकास पत्र’ (KVP) ही दीर्घकालीन योजना 115 महिन्यांसाठी 7.5% व्याजदरासह गुंतवणूकदारांना रक्कम दुप्पट करण्याची संधी देते. तर, ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही मुलींसाठी विशेष योजना आहे. 15 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर 21 वर्षांनंतर या योजनेचा कार्यकाळ संपतो . परंतु, योजनेत 8.2% व्याजदरासह मोठा परतावा मिळतो.
दरम्यान, या सर्व योजना विविध गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अधिक लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहेत.