Post Office Schemes | आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत ठेवत असतात. महागाईचा विचार करता, आज केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात जाऊन तुम्हाला खूप चांगला फायदा देऊ शकते. परंतु आजकाल बाजारामध्ये अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहेत. कशात गुंतवणूक केल्याने चांगला फायदा मिळेल हे लोकांना माहीत नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही योजना सांगणार आहोत .ज्यामध्ये तुम्ही अगदी निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीचे अनेक पर्यायी उपलब्ध असताना देखील आजकाल अनेक लोक हे पोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास ठेवतात. कारण ही अनेक वर्षापासून चालत आलेली एक विश्वासहार्य योजना आहे. आणि आज आपण पोस्ट ऑफिसच्या (Post Office Schemes) काही योजनाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिस एफडी | Post Office Schemes
बँकाप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये देखील वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एफडी योजना असतात. जर तुम्हाला चांगले व्याज मिळवायचे असेल, तर पाच वर्षाच्या एफडीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या एफडीवर सध्या 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
या योजनेत देखील पाच वर्षासाठी गुंतवणूक केली जाते. सध्या या योजनेमध्ये 7.60% दराने व्याजदर दिले जाते. तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याला यावर मर्यादा नाही.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते. या योजनेमध्ये देखील तुम्ही पाच वर्षासाठी रक्कम जमा करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला 8.2% दराने व्याजदर मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत फायदेशीर अशी योजना आहे.
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना | Post Office Schemes
पोस्ट ऑफिस एमआयएस या नावाने प्रसिद्ध असलेली योजना आहे. ही मासिक उत्पन्न मिळवून देणारी एक चांगली योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही एका खातात 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक आणि संयुक्त खातात 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला दर महिन्याला 9250 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते