काय सांगता? पोस्टाच्या तिकिटावर छापला चक्क छोटा राजनचा फोटो ; टपाल विभागाचा अनागोंदी कारभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कुख्यात गुंड छोटा राजन (Don Chhota Rajan) आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या (Indian Postal Department) ‘माय स्टॅम्प’ योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल तिकीट (postage stamps) पाच रुपयांचे असून १२ टपाल तिकीट छोटा राजन आणि १२ मुन्ना बजरंगीचे आहेत. टपाल खात्याला यासाठी ६०० रुपये फी दिली गेली. तिकिटांची छपाई करण्यापूर्वी ना छायाचित्रांची तपासणी केली गेली की, ना प्रमाणपत्र मागितले गेले.

कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयातून आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन आणि बागपत तुरुंगातील गँगवॉरमध्ये मारला गेलेला मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली टपाल तिकिटं जारी करण्यात आली आहेत. या तिकिटांच्या मदतीनं पत्र पाठवली जाऊ शकतात.भारतीय टपाल विभागानं ‘माय स्टँप’ योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेले टपाल तिकिटं छापली आहेत

 

टपाल विभागाचे पोस्ट मास्टर जनरल वीके वर्मा यांनी सांगितलं आहे की, “नियमाअंतर्गत तिकीट काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कार्यालयात हजर राहावं लागतं. तिथे वेबकॅमच्या आधारे फोटो घेतला जातो. जर कोणत्या गुंड किंवा माफियाच्या नावे तिकीट प्रसिद्द झालं आहे तर चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’