कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी ।  विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान याआधी विधानसभा निवडणुकीच्या कामावर असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवसात १ हजार ४९ जणांनी मतदान केले. मतदानाची प्रक्रिया मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यात ८ हजार ७५३ सैनिक मतदार आहेत. याशिवाय निवडणूक कामावर दहा हजारांवर अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांना पोस्टल मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने केली आहे.

प्रशिक्षणाच्या ठिकाणीच विधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टल मतपत्रिका स्वीकारल्या जात आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी १ हजार ४९ जणांनी मतदान केले. सैनिक मतदार आपली मतपत्रिका पोस्टाने पाठवत आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय सैनिक मतदार चंदगड : २२५०, राधानगरी : १०८५, कागल : १८०७, दक्षिण : ४९१, करवीर : ६४८, उत्तर : ९६, शाहूवाडी :१२२३, हातकणंगले : ४०७, इचलकरंजी : १४८, शिरोळ : ५९८ असे आहेत.

Leave a Comment