काजोलच्या पहिल्या शॉर्ट फिल्म ‘देवी’चे पोस्टर रिव्हिल; केवळ दोन दिवसात शूट केली फिल्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी नवे ऐकायला मिळते. बॉलीवूड कलाकार त्यांच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा करतच असतात आणि आता अभिनेत्री काजोलच्या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक समोर आला आहे. काजोलने शॉर्ट फिल्मच्या जगात पाऊल ठेवणार असून तिच्या पहिल्या चित्रपटाचे देवीचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

या चित्रपटात श्रुति हसन, नेहा धूपिया, नीना कुलकर्णी, मुक्ता बावरे, संध्या म्हात्रे, रामा जोशी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी दयामा यांच्यासह काजोल दिसणार आहे. हा चित्रपट एका छोट्या खोलीत राहणार्‍या ९ महिलांच्या कथेवर आधारित आहे. या ९ महिलांना त्यांच्या आयुष्यात खूप अडचणींना समोर जात आहेत. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांच्या वेदना आणि राग पडद्यावर चित्राला आहे.

देवी या शॉर्ट फिल्मचे शूटिंग फक्त दोन दिवसांत झाले आहे. निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी एकत्रितपणे इलेक्ट्रिक एपल्स एंटरटेनमेंट या बॅनरखाली या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. प्रियंका बॅनर्जी यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या शॉर्ट फिल्मच्या अनुषंगाने काजोल व्यतिरिक्त श्रुती हासनने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे.

 

या शॉर्ट फिल्म बद्दल सांगताना काजोल म्हणली कि, ‘माझ्या पहिल्या शॉर्टसाठी देवी पेक्षा चांगला विषय निवडला जाऊ शकला नाही. या शॉर्ट फिल्मची संहिता खूप दमदार असून आहे, प्रियांकाने ती खूप चांगल्याप्रकारे लिहली आहे. ही अशी एक शॉर्ट फिल्म आहे जिला जगासोबत शेयर करणं गरजेचं आहे. विशेषतः आजच्या काळात. मी माझ्यापेक्षा खूप वेगळी असलेल्या ज्योतीची भूमिका साकारत आहे. पण आपल्यातही बर्‍याच साम्य आहेत. आजच्या काळात जिथे लिंगभेद, शोषण आणि दडपशाही यावर जोरात आवाज उठविला जात आहे, तिथे देवी सारखा चित्रपट अत्यावश्यक आहे. मला आनंद आहे की मला या शॉर्ट फिल्मचा भाग होण्याची संधी मिळाली.

Leave a Comment