Potassium | आपल्या निरोगी आरोग्यासाठी शरीरातील विविध पोषक तत्वांची खूप गरज असते. यातच पोटॅशियम हे देखील खूप गरजेचे आहे. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम खूप आवश्यक असे पोषणतत्व आहे. त्यामुळे आपल्या आहारात पोटॅशियमचा (Potassium) समावेश असणे खूप गरजेचे असते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे उच्च रक्त दाबाचा धोका देखील वाढत असतो. तसेच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसंबंधीच्या आजार वाढत असतात. परंतु जर पोटॅशियम योग्य प्रमाणात असेल, तर तुम्हाला कोणताही धोका राहत नाही. आपल्या शरीराच्या पोषक तत्वांसाठी आणि हालचालीसाठी पोटॅशियम मदत करते. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील पोटॅशियम अत्यंत महत्त्वाचे असे मानले जाते.
पोटॅशियमच्या (Potassium) कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो . पोटॅशियम हे आपल्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची अशी पोषक तत्वे आहे. यामुळे आपल्या हृदयाच्या स्नायूंना बळकटी प्राप्त होते. जर आपल्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल, तर हायपोलेमिया म्हणून ओळखला जातो. यामुळे हृदयाचे कार्य नीट होत नाही. तसेच पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदय विकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांचा समस्या वाढतात अशा लोकांना कधीही हृदयविकाराचा धोका येऊ शकतो.
जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची (Potassium) कमतरता असेल किंवा तुम्ही हायपोक्लेम यांनी ग्रस्त असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू शकतात. यामध्ये तुमचे हृदय अचानक धडधडू लागते. तसेच कधीकधी श्वास घेण्यात देखील अडचणी निर्माण होतात. काही प्रकरणांमध्ये हृदयाचे ठोके अचानक वाढतात. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही केळी, बटाटा, अवाकॅडो, पालेभाज्या यांचा समावेश करू शकता. जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल, तर तुम्हाला डीहायड्रेशन देखील होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी भरून निघेल. तसेच इतर वेगवेगळ्या आजारांपासून देखील तुम्ही मुक्त व्हाल.