भुताटकीने पछाडलेल्या ‘या’घरातून आजही येतात भांड्यांचे आवाज; जाणून घ्या सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील एका घरातील भुताच्या कथांमुळे त्याच्या मालकाचा त्या घरातील रस कमी झाला आहे.हेच कारण आहे की या घराचे मालक ते विकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,परंतु त्या घरातील भुताच्या गोष्टी सगळीकडे इतक्या पसरल्या आहेत कि त्यामुळे कोणीही ते घर विकत घेईन त्यामुळे ते बंदच केले गेले आहे.

‘डेली स्टार’ च्या वृत्तानुसार, येथे राहणाऱ्या एका महिलेने असा दावा केला की तिच्या घरात तिच्या आजीचा आत्मा वास करतोय आहे.ती अजूनही येथेच राहते आणि तिच्या जेवण बनवण्याच्या हालचालीचे भास इथे नेहमीच जाणवतात.या घरासाठी बोली लावण्यासाठी या घराची को-ओवनर सिल्व्हिया मॅकलिनने फेसबुकवर त्या घराचे अनेक फोटो शेअर केले,परंतु त्या घरा संबंधितल्या अनेक भयावह कथांमुळे लोक इतके घाबरले आहेत की कोणीही ते विकत घेण्यास आले नाही.

SYFY - The It house was actually a creepy haunted house IRL, too ...

सिल्व्हिया, जिला आपली ही जमीन नवीन बांधकाम करण्यासाठी वापरायची आहे,ती असे सांगते की तिनेसुद्धा या घरास एका वृद्ध स्त्रीने पछाडल्याच्या कित्येक कथा तिने ऐकल्या आहेत,तर येथील पूर्वीच्या मालकांनीही हे घर या आत्म्यामुळेच खाली केले आहे.काही तांत्रिकांनाही या आत्म्याला वश करण्यासाठी बोलावले गेले होते.त्याच वेळी,एकेकाळी या घरात राहत असलेले डॉन वॅलॉट डीक्लॉट असा दावा करतात की त्याची आजी अ‍ॅडले या अजूनही
ठिकाणीच राहत आहेत.

हे घर १९६० च्या सुमारास १६० एकर जागेवर बांधले गेले होते आणि डॉन यांच्या आधी राहणारे लोक या घराचे मालक होते.त्याच वेळी,१९६७ मध्ये घराच्या पुढच्या खोलीत त्याची आजी अ‍ॅडले यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्याचे कुटुंब ८० च्या दशकात हे घर सोडून इतरत्र स्थायिक झाले. डॉन म्हणाला, “आमचा विश्वास आहे की ते भूत अ‍ॅडले यांचेच आहे,परंतु ती अजिबात बदललेली नाही. त्यावेळी ती जवळजवळ ९० वर्षांची होती आणि ती नेहमीच भांड्यांमध्ये असायची.याचा अर्थ असा की ती बर्‍याचदा स्वयंपाकघरातच काम करायची.ते तिथेच असायची.कारण त्यावेळी आम्ही तिच्याबरोबर राहत होतो,त्यामुळे हे आम्हाला चांगलेच माहित आहे कारण आम्ही त्यांचा आवाज ऐकायचो.कधी पॅनचे झाकण उचलण्याचा आवाज ऐकू येताच स्वयंपाकघरात जायचो पण तिथे कोणीही नसायचे. “

Steam Community :: :: Pennywise's house

तथापि, सिल्व्हिया म्हणाली की ‘याबद्दल काही चांगल्या गोष्टीही आहेत ज्या पछाडल्या गेल्या असूनही छान वाटू लागल्या’. सिल्व्हियाच्या फेसबुक पोस्टला मिळालेल्या शेकडो प्रतिक्रियांपैकी एकाने लिहिले की, “हो, ती जागा पछाडलेली आहे. माझे मित्रदेखील कधी वेळी तिथे एकत्र राहत होते. आम्ही खरोखरच एकत्रित याचा अनुभव घेतला आहे आणि आम्ही अजूनही याबद्दल बोलतो. दुसर्‍या एकाने लिहिले,मी या घराला भेट दिली तेव्हा छतावरील आणि भिंतींकडून फारच विचित्र असे आवाज ऐकु आले.

मात्र,सिल्व्हियाला आशा आहे की कधीतरी हे घर नक्कीच विकत घेतले जाईल.परंतु तोपर्यंत ते बंद ठेवले पाहिजे.आम्हाला माहित आहे की एखाद्यासाठी याचे काही ऐतिहासिक मूल्य असेल आणि त्याच्या कथांवर आधारित,हे त्यांच्यासाठी एक चांगले स्थान असेल, परंतु आपल्यासाठी आमच्या कुटुंबाचा हा एक अध्याय आहे, जो पुढे जाईल. ती म्हणते की आम्ही कदाचित हे घर पडू शकणार नाही आणि कदाचित मग आम्ही ते पुन्हा एकदा मूळ मालकाला परत करु.

IT’s Homely Horror: What to Do with a Haunted House | Horror Movie | Horror  Homeroom

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment