Poultry Farm Loan | पोल्ट्री फार्म सुरू करण्याची सुवर्णसंधी! सरकार ‘या’ योजनेअंतर्गत देणार 10 लाख रुपये अनुदान

0
2
Poultry Farm Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Poultry Farm Loan | आजकाल अनेक शेतकरी शेतीला जोडून व्यवसाय करत असतात. यामध्ये पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांचा समावेश होतो. लोक आजकाल शेतीला व्यवसायिक दृष्टिकोनातून बघत आहेत. आजकाल शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो रुपयांनी कमवत आहेत आणि व्यवसाय देखील करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या या व्यवसायांना सहाय्य देत आहे.

सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय करायला खूप चांगली संधी आहे. आजकाल कुक्कुटपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे.महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना (Poultry Farm Loan) असे आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करण्यासाठी कर्ज मिळते.

महाराष्ट्र कुकुटपालन कर्ज योजनेचे स्वरूप

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार हे कुक्कुटपालनासाठी कर्जाच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना मदत करते. त्यासाठी सरकारने ही कर्ज योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता व्यवसायाला आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगले कर्ज देखील मिळत आहे. शेतकऱ्यांना पोल्ट्री फार्मसाठी बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारकडून शेतकऱ्यांना मिळते.

कर्ज फेड करण्याचा कालावधी 5 ते 10 वर्ष एवढा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला व्यवसाय करायची संधी मिळत आहे. आणि कर्ज परतफेड करण्याचा कालावधी देखील जास्त असल्याने त्यांना पैसे गोळा करण्यास मदत होते.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Poultry Farm Loan

  • आधार कार्ड
  • आत्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मतदार ओळखपत्र
  • बँक स्टेटमेंटचा फोटो
  • पोल्ट्री फार्म व्यवसायाचा परवाना
  • ॲनिमल केअर मालकाकडून परवानगी
  • विमा पॉलिसी
  • मोबाईल नंबर

अर्ज कसा करायचा ?

  • या योजनेचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन त्या ठिकाणी योजनेचा अर्ज भरावा लागेल.
  • अर्ज मिळाल्यानंतर त्याच्यावरती सर्वच माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • हा फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक सगळी कागदपत्र जोडावी.
  • त्यानंतर तुमचा फोटो चिटकवून त्यावर सही करावी.