कोयना धरणातील वीज निर्मिती बंद

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

खासगीकरण आणि कामगार विराेधी धाेरणाच्या निषेर्धात सुरु असलेल्या संपात महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला आहे. याचा परिणाम सातारा जिल्ह्यातील काेयना धरणातीळ वीज निर्मितीवर झाला असून धरणातून हाेणारी वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे.

महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्प सुरु केला असल्यामुळे रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून कोयना धरण पायथा विद्युत केंद्रातील वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. यामुळे येथील पाणी नदीत साेडण्यात आले आहे.

Private Ad 3rd Paragrah

दरम्यान आज धरण व्यवस्थापानाने दिलेल्या माहितीनूसार कोयना धरणाच्या नदी विमोचकामधून आज (साेमवार) सकाळी 11 वाजता 2098 घनफूट प्रती सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पायथा विद्युत गृह बंद असल्याने ही कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले आहे.

कोयनेत सध्या 63.33 टीएमसी शिल्लक पाणीसाठा –

कोयना धरणाचे पायथा विद्युत गृह बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोयना नदी विमोचकामधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. एकूण प्रतिसेकंद 2098 घनफूट इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या 62.33 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी 46.557 मीटर इतकी आहे. पायचा विद्युत ग्रह बंद असून सध्या केवळ नदी विमोचकामधून 2098 घनफूट पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शिल्लक पाण्यापैकी 15 टीएमसी पाणी कोटा हा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आहे.