बुलडाणा प्रतिनिधी। लोणार तालुक्यातील बिबी येथील मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात २५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाल आहे. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरण कंपनीन तातडीन उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील महिला वर्गांनी दिला आहे.
बिबी येथील डिपी वरून मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र या डिपी वरील ट्रांसफार्मर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळ गावकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झालीये. मध्यंतरीच्या काळात हा ट्रान्सफाॅर्मर दोन वेळेस बसवला. परंतु ज्या दिवशी ट्रांसफार्मर बसवला त्याच दिवशी तो जळतो.
या त्रासान कंटाळून संतापलेल्या महिलांनी विज वितरण कंपनीच्या ऑफिसवर मोर्चा काढला. यावेळी संबंधितांनी याच कारण शोधून काढाव. अन्यथा दुसरा वेगळ्या ठिकाणी नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा महिलांनी दिला आहे.
इतर काही बातम्या-
‘या’ गावात नेत्यांना, अधिकार्यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात रस्ता नाही असा आरोप@NCPspeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMOIndia @NCPpbn https://t.co/9hLfN01Guk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019
मतदार जागृती करण्यात दिव्यांगांचाही पुढाकार
सविस्तर बातमी – https://t.co/06Zwn29hud#hellovidhansabha#hellomaharashtra@ECISVEEP #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
यवतमाळमध्ये वीज पडून युवकाचा मृत्यू ; प्रत्यक्ष मृत्यू पाहिल्याने कुटुंबीयांची कालवाकालव
सविस्तर वाचा- https://t.co/W89gG4gJ4f#farming#yavatmal#thundring#LightningStrikes
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019