PPF Or FD | PPF की FD ? चांगल्या परताव्यासाठी कशात गुंतवणूक करावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे

PPF Or FD 
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PPF Or FD  | आजकाल अनेकजण भविष्याच्या दृष्टिकोनातून काही ना काही गुंतवणूक करत असतात. त्यातून कमावलेल्या पैशातून थोडासा वाटा त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित करून ठेवतात. आजकाल गुंतवणुकीचे अनेक मार्ग देखील आहेत. अनेक लोक पीपीएफमध्ये पैसे गुंतवतात. तर अनेक लोक बँकेमध्ये सेव्हिंग करून पैशाची बचत करतात. आता या दोन्ही योजना सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. परंतु त्याचे काही तोटे देखील आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज हे दर तीन महिन्यांनी बदलत राहते. पीपीएफ आणि एफडीपैकी (PPF Or FD ) कोणता पर्याय तुम्हाला जास्त फायदा देईल हे आपण पाहणार आहोत

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ चांगला पर्याय (PPF Or FD )

पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला कर भरण्याची गरज पडत नाही. तुम्हाला या एफडीमध्ये गुंतवलेल्या पैशाच्या व्याजावर टॅक्स लॅबनुसार कर द्यावा लागतो. त्याचप्रमाणे एफडीवर सरकार कोणतीही गॅरंटी देत नाही. परंतु पीपीएफमध्ये सरकारकडून गॅरंटी दिली जाते. हा पैसा सुरक्षित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्याचप्रमाणे यातून चांगला परतावा देखील मिळतो. यामध्ये दीर्घ मुदतीसाठी पैशाची गुंतवणूक करता येते. मात्र एफडीमध्ये मर्यादित काळासाठी गुंतवणूक करता येत नाही.

कोणत्या योजनेवर जास्त व्याज मिळते

अनेक लोकसेवा निवृत्तीनंतर टॅक्स सेविंगसाठी पीपीएफ या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ योजना अत्यंत चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गत जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये 7.1% एवढे व्याज दिले जाते. परंतु एफडीवर एसबीआय बँकेत 6.50% एवढे व्याज देते. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली, तर आणि मध्येच व्याजदर वाढला, तर तुमचे नुकसान देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे व्याज देण्याचा तुम्हाला फायदा मिळणार नाही. त्यामुळे पीपीएफ योजना जास्त चांगली मानली जाते.

पीपीएफमधून आपत्कालीन स्थितीत पैसे काढता येतात

या पीपीएफ योजनेत अनेक फायदे असतात. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यानंतर हे खाते 15 वर्षांनी मॅच्युर होते. त्यामुळे तुमची मुदत संपल्यानंतर पैसे काढून तुम्ही ते खाते बंद करू शकता. किंवा पाच वर्षांनी तुमच्या खात्याचा कालावधी देखील वाढवू शकता. म्हणजेच पीपीएफ योजनेअंतर्गत तुम्हाला गरज पडली, तर काही रक्कम काढता देखील येते. म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर सात वर्षांनी उपचारासाठी, मुलाचे शिक्षण, लग्न अशा महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही यातून पैसे काढू शकता. त्यामुळे दीर्घकाल्यासाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी पीपीएफ चांगला पर्याय आहे.