एकतर्फी प्रेमातून हत्या झालेल्या प्राचीचे नेत्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | ठाणे येथे एकतर्फी प्रेमातून भरदिवसा हत्या झालेल्या प्राची झाडे च्या पालकांनी प्राचीचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी दुपारी कोपरे येथे प्राची कामावर जात असताना आकाश पवार याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात प्राची गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला होता.
रविवारी ठाणे जिल्हा रुग्नालयात प्राचीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी प्राचीच्या पालकांच्या इच्छेनुसार तिचे नेत्रदान केले जात असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ कैलास पवार यांनी दिली. प्राची च्या कुटूंबियांवर सदरील घटनेमुळे शोककळा पसरली असून आरोपी आकाश यास कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे.

Leave a Comment