Pradhanmantri Mudra Yojana | प्रधानमंत्री मुद्रा योजनेत मोठा बदल; लहान व्यवसायिकांसाठी मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pradhanmantri Mudra Yojana । लहान उद्योगाना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमी कार्यशील असते. दिवाळीनिमित्त लोकांच्या उद्योगाचा विस्तार व्हावा , यासाठी मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. लोकांच्या कल्याणासाठी सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Pradhanmantri Mudra Yojana) आता दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या योजनेमार्फत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते . पण आता त्यामध्ये वाढ करून , ती रक्कम 20 लाखापर्यंत केली आहे. या योजनेसाठी सरकारने अधिसूचना जारी केली असून, उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी अधिक निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे हि बातमी उद्योजकांसाठी फायदेशील ठरणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्थसंकल्प | Pradhanmantri Mudra Yojana

2024 -25 मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये कर्जाची रक्कम 10 लाखावरुन 20 लाख करण्यात आली आहे. त्यामुळे हि घोषणा प्रत्यक्षात आली असल्याचे दिसून येत आहे. या निर्णयामुळे व्यवसायिकांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत मिळणार आहे. प्रामुख्याने ज्या व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे.

योजनेच्या तीन श्रेण्या

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत तीन श्रेण्या आहेत ,त्यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण यांचा समावेश होतो . शिशु योजनेत 50000 रुपयांपर्यंत, किशोर योजनेत 50000 ते 5 लाख रुपयांपर्यंत, तर तरुण योजनेत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते . या योजनेत नवीन तरुण प्लस श्रेणी सुरू करण्यात आली आहे , ज्यामध्ये तरुण श्रेणीतील कर्ज यशस्वीरीत्या फेडलेल्या व्यावसायिकांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल.

लहान उद्योजकांना आर्थिक पाठबळ | Pradhanmantri Mudra Yojana

यासोबतच प्रधानमंत्री मुद्रा योजनेमार्फत मायक्रो युनिट्ससाठी क्रेडिट गॅरंटी फंडच्या माध्यमातून 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर हमी कव्हरेजही दिले जाणार आहे. यामुळे लहान उद्योजकांना आर्थिक पाठबळ मिळेल तसेच ते त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आत्मविश्वासाने करतील . या निर्णयामुळे दिवाळीत अनेक उद्योजकांना मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.