सकलेन मुलाणी ।कराड
येरवळे येथील शरद यादव शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना पोहता येत नाही. मात्र मुलगी तनुजाला त्यांनी स्वीमींगला दाखल केले आहे. त्याठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यात ती तरबेजही झाली आहे. पोहण्याच्या स्पर्धेत तिने ठिकठिकाणी बक्षिसे पटकावली आहेत. पोहण्यात तरबेज असणाऱ्या तनुजाने कुंटूबाचा जीव वाचवण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. परंतु आजी व भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर वाईट काळाचा घाला घातला गेला आहे.
तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणुन पाण्याबाहेर काढले. काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. बाहेर काढत असताना तोवर काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडली.
घटनेची माहिती मिळताच येरवळेसह परिसरातील नागरिकांनी धाव तिकडे घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. शोध मोहिम राबविली. त्यानंतर भावाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र नियतीने तोवर डाव साधला अन् आजी अणि नातवाचा जीव त्यात गेला.
वडील शरद यादव यांना वाचविण्यात तनुजा यशस्वी ठरली. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तिने केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. तेही केवळ सात वर्षाच्या जिगरबाज मुलीने जिवाची पर्वा न करता पोहण्याचा कलेचा पुरेपूर वापर करत तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णत: यश आले नाही. आजी अणि भावाचा दुर्दैवी मृत्यु झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’