सरकारला आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही – प्रकाश आंबेडकर

Thumbnail 1532710501255
Thumbnail 1532710501255
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार | मराठा, पटेल, जाट, गुज्जर यांच्या आरक्षण प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. आरक्षणाच्या तिड्यावर राज्यवार अहवाल केंद्रीय गृह खात्याने मागवले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेकरांनी सूचक विधान केले आहे. जर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायचे असेल तर घटनेत तशी तरतूद नाही त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार असे आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते.