Wednesday, March 29, 2023

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी; प्रकृती स्थिर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आता प्रकाश आंबेडकर हे सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे असेही त्यांनी सांगितले.

आज सकाळी रेखा ठाकूर यांनी एक पत्रक जारी करुन प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. अशी माहिती रेखा ठाकूर यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, कालच प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करून तीन महिने कार्यरत राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.