पुर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

‘पूर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत. आघाडीतील पक्ष हाती लागेल ते घेऊन जायचे, आताचे सत्ताधारी संघटीतपणे भ्रष्टाचार करतात’ अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकार केली. आज पाथरी व परभणी येथील वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजीत जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

आंबेडकर पुढे म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना हस्तांदोलन करण्याच्या मोबदल्यात मोदींनी भारतातला शेतकरी विकला असून अमेरिकेचा कापूस चार हजार रुपये क्विंटल प्रमाणे गुजरातच्या बंदरांमध्ये उतरविल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला आता चार हजार रुपयापेक्षा कमी दर मिळण्याची शक्यता आहे. तो साडे ३ हजार रुपये इतक्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे असेल तर ही आयात थांबवणारे सरकार महाराष्ट्रात आणा अस आवाहन त्यांनी यावेळी केलं.

यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्र कधी खाजगी होणार नाही असे त्यांचे धोरण अवलंबिले होते. वंचित बहुजन आघाडीचे राज्यात सरकार आल्यास आम्ही तेच धोरण अवलंबू त्यामुळे सहकारी कारखानदारी पुन्हा सक्षम होईल. गावागावात छोट्या उद्योगांना प्राधान्य देऊ. त्यामुळे स्थानिकांना गावातच काम मिळेल. बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल. मोठमोठ्या कारखानदारी चा उपयोग काय ? प्रचंड लोकसंख्या वाढली आहे लोकसंख्येला अनुसरून उद्योगांची भूमिका असली पाहिजे आणि ते आम्ही घेणार असंही बाळासाहेब यावेळी म्हणाले. आमचं सरकार आल्यास सुमारे दोन लाख छोटे उद्योजक महाराष्ट्रात उभे करू असे असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. लोकसभेच्या वेळी वंचित बहुजन आघाडी ने दिलेल्या जाहीरनाम्याची कॉपी-पेस्ट करीत काँग्रेसने तो विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या रूपाने मांडला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. यासंदर्भात खरे-खोटे करण्यासाठी आपले काँग्रेसला जाहीर आव्हान आंबेकरांनी दिले. विधान परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा १५ तारखेला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती त्यांनी सभेत दिली.

Leave a Comment