गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत; शपथविधीचा दिवस ठरला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच गोवा विधानसभेची निवडणूक पार पडली. या ठिकाणी भाजपने विजय मिळवला. गोवाह्यातील निवडणुकीनंतर आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पडणार हे निश्चित झाले आहे.

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपाने चांगला विजय मिळवला. गोव्यात भाजपने विजय मिळवल्यानंतर त्या ठिकाणी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्यातील भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी एक ट्विट केले. आणि त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आमचा पक्ष गोव्यातील लोकांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा राज्याची सेवा करण्याचा जनादेश दिला आहे. आम्ही येणाऱ्या काळात गोव्याच्या प्रगतीसाठी काम करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केल्यानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पदी पुन्हा प्रमोद सावंत विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान होळीच्या सणानंतर सावंत हे आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे.