Pranayama Benefits | रोज 10 मिनिटे प्राणायाम केल्याने होतात अनेक फायदे, शरीरासोबतच मनही राहते निरोगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pranayama Benefits | आजकाल धकाधकीच्या या जीवनात आपल्या शरीराकडे आणि तब्येतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशातच प्राणायाम ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी प्रक्रिया आहे. यामुळे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे ठराविक कालावधीत आपल्याला श्वासावर नियंत्रण ठेवता येते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून मिळणाऱ्या फायद्यामुळे अनेकजण आता हळूहळू प्राणायाम चालू करत आहे. आता या प्राणायामामुळे तुम्हाला रोज काय फायदे होतात हे आपण पाहूया.

चांगली झोप लागत

आजकाल प्रत्येकजण कामाच्या मागे धावते. त्यामुळे त्यांची वेळेवर झोप होत नाही. आणि झोपेच्या कमतरतेमुळे त्यांना अनेक आजार देखील उद्भवतात. आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. परंतु प्राणायाम ही समस्या दूर होण्यास मदत करते. प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. त्यामुळे चांगली झोप लागते. म्हणूनच दररोज किमान दहा मिनिटे प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे.

फुफ्फुसासाठी फायदेशीर

अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, प्राणायाम केल्याने आपली खूप उशीर मजबूत होण्यास मदत होते. प्राणायाम करताना दीर्घ श्वास घ्यावा लागतो. त्यामुळे फुफ्फुसातील अनेक ठिकाणी ऑक्सिजन पोहोचतो आणि फुफ्फुसांचे स्नायू देखील मजबूत होतात.

रक्तदाब कमी करण्यास मदत होते | Pranayama Benefits

आजकाल उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना ही समस्या उद्भवते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित असणे आजकाल खूप महत्त्वाचे आहे. प्राणायाम केल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो आणि रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास देखील मदत होते.

शारीरिक तणाव कमी करण्यास मदत

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची संबंधित अनेक आजार उद्भवतात. हृदयविकार, मधुमेह उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या येतात. त्यामुळे त्यांना कमी करण्यासाठी प्राणायाम आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे.

मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम फायदेशी

प्राणायाम करताना आपल्या लक्ष हे आपल्या श्वासावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे माइंड फुलनेस करण्याचा मदत होते. आणि तुमचा ध्यान करण्याचा एक मार्ग निर्माण होते त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले होते.