आघाडीतील बिघाडी टळली, राष्ट्रवादी युवक अध्यक्षाने घेतली प्रणिती शिंदेंविरुद्ध माघार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । युत्या आणि आघाड्या झाल्या तरी काही उमेदवार हे तयारी केली असल्याकारणाने निवडणूक लढवण्यावर ठाम राहतात. अशावेळी अपक्ष उभं राहणं किंवा वुइरोधी पक्षातील नेत्यांना मदत करणं असेही प्रकार पाहायला मिळतात. सोलापूर मध्यच्या जागेसाठी अशीच आघाडीत बिघाडी होतेय का? असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी आपण निवडणुक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोलापूर मध्य विधानसभेच्या जागेसाठी त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. प्रणिती शिंदे याना या मतदारसंघातून माजी आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर दिलीप माने यांच्याशी सामना करावा लागणार आहे. दिलीप माने याना शिवसेना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. दरम्यान जुबेर बागवान यांच्या माघार घेण्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment