मुंबई | प्रँक व्हिडिओ युट्यूबवरती अलीकडे- अलीकडे आलेला एक नवीन ट्रेंड आहे. प्रँक व्हिडिओ कधीकधी विनोदी पद्धतीने शूट केले जातात तर, कधी अश्लील पद्धतीने शूट केलेले पाहायला मिळतात. अशाच एका व्हिडिओचा मुंबई सायबर पोलिसांनी प्रकार उघड केला आहे. असभ्य आणि अश्लील वर्तवणूक करून शूट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जात होते. यासंदर्भात सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अटक केलेले तीनही आरोपी हे युट्युबवर व्हिडिओ टाकत असे. ही टोळी प्रॅन्क करण्याच्या बहाण्याने अनेक मुलींना समुद्रकिनारी बोलवत असे. येथील काही मुलं त्या मुलींसोबत अश्लील भाषा आणि सोबतच मुलींना त्यांच्या प्रायव्हेट अंगाला स्पर्श केले जात होते. व्हिडिओच्या शेवटी, हा व्हिडीओ केवळ प्रँक करण्यासाठी घेतला असल्याचे भासवले जात होते.
या प्रकरणाची काही मुलींनी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी हा दहावीमध्ये केंद्रात प्रथम आला होता. थोडेफार पैसे आणि आपल्या चॅनलला लाईक मिळतील यासाठी तो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असे. मुंबई सायबर पोलिसांनी या संदर्भात 17 यूट्यूब चैनलला नोटीस बजावली आहे.