हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Prashant Jagtap Joined Congress । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम ठोकल्यानंतर प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मी संविधान रक्षणासाठी लढणाऱ्या आणि पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ असलेल्या पक्षात मी प्रवेश करेन, असं प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच सांगत काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले होते. अखेर आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे काँग्रेस मजबूत झाली आहे.
आपल्या भाषणात प्रशांत जगताप म्हणाले, मी शाहू, फुले, आंबेडकर, गांधी आणि नेहरूंच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. ज्यांनी मला सुरुवातीच्या काळात संधी दिली आणि ज्यांच्यासोबत मी २६ वर्ष काम केलं त्या शरद पवार साहेबांचे आभार मानतो. माझं कधीही त्यांच्याशी भांडण किंवा वाद नाही. माझी विचारधारा ठाम आहे. माझी लढाई हि भाजपविरोधात आहे, माझी लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधात आहे, माझी लढाई धर्मीय आणि जातीय आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे असं म्हणत प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात गुन्हेगारीत पहिला क्रमांक पुण्याचा आहे, भष्ट्राचारात पुणे आघाडीवर आहे, ट्राफिक कोंडीत पुणे देशात पाचव्या क्रमांकावर आहे.. आणि हा केंद्राचा अहवाल आहे. या सगळ्याविरोधात माझा लढा आहे असं म्हणत प्रशांत जगताप यांनी रणशिंग फुंकले. Prashant Jagtap Joined Congress
राजकारण सोडेन, पण काँग्रेस सोडणार नाही- Prashant Jagtap Joined Congress
ते पुढे म्हणाले, मला खात्री आहे, ज्या पक्षात मी जाईन तिथे इमानदारीने काम करेन. शरद पवार साहेबांच्या पक्षात मी २६ वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. आता काँग्रेससाठीही प्रामाणिकपणे काम करेन. पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. मी कधीही काँग्रेस सोडणार नाही. एकवेळ मी राजकारण सोडेन, पण काँग्रेस सोडणार नाही. पक्षाने मला संधी देऊ किंवा न देवो, मी काँग्रेसचे काम करत राहील. पक्ष मला काय देईल यापेक्षा पक्षाला मला काय देता येईल हाच माझा विचार राहील असेही प्रशांत जगताप यांनी म्हंटल.




