Prashant Jagtap : प्रशांत जगताप यांना ठाकरेंचा फोन!! दिली मोठी सर्वात मोठी ऑफर

Prashant Jagtap
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Prashant Jagtap । पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतायेत असे चित्र दिसताच शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर अनेक पक्षाकडून त्यांना वेगवेगळ्या ऑफर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा रात्री उशिरा प्रशांत जगताप यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तुम्ही आमच्या पक्षात या अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना दिली.

प्रशांत जगताप यांनी स्वता याबाबात माहिती देताना सांगितलं कि, होय, मला उद्धव साहेबांचा फोन आला. मी त्यांचा ऋणी आहे कि त्यांनी माझ्याशी बोलण्यासाठी वेळ काढला. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, तरीही उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मोठया नेत्याने तब्बल ९ मिनिटे माझ्याशी चर्चा केली हे मी कधीही विसरणार नाही अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. तुम्ही माझ्या नेतृत्वात काम करू शकता, आम्ही तुमचा योग्य तो सन्मान राखू असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप याना दिले. पुण्याच्या भल्यासाठी आणि भाजपविरोधी लढण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत या अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना दिली.

काँग्रेसमध्ये जाणार प्रशांत जगताप – Prashant Jagtap

दरम्यान, प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये जाण्याचे जवळपास निश्चित झालं आहे. आज दुपारी १२ वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल. प्रशांत जगताप यांच्यासारख्या तरुण, तडफदार आणि जमिनीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे पुणे काँग्रेसला नक्कीच बळ मिळाले यात शंका नाही.

पक्ष सोडताना काय म्हणाले होते जगताप

27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले होते. त्यांच्या या विधानातूनच ही गोष्ट स्पष्ट होते की ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही. नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.