प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; दिल्लीत घडामोडींना वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार सध्या दिल्लीत असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान प्रशांत किशोर- पवार यांच्यातील भेटीमुळे पुन्हा एकदा देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक वर तब्बल साडेतीन तास चर्चा केली होती. देशातील एकूण राजकीय परिस्थिती, मोदींविरोधातील जनतेच्या मनातील रोष, त्यातील निर्माण झालेली तिसऱ्या आघाडीची शक्यता यावर तेव्हा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती होती.

दरम्यान, शरद पवार यांचे अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत अंत्यत चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मायावती, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे पवारांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्व विरोधकांची एकत्रपणे मोट बांधून पवार भाजपला चारीमुंड्या चित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत प्रशांत किशोर –

प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीतज्ञ म्हणून ओळखले जातात. आत्तापर्यंत त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

Leave a Comment