Prashant Kishor Prediction 2024 Election : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा जिंकेल?? प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Prashant Kishor Prediction 2024 Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या तारखा केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने जागावाटप, प्रचार, रणनीती यावर सर्वांचे काम सुरु आहे. देशात यंदा भाजपप्रणीत एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया मध्ये सामना पाहायला मिळेल. त्यातच आता प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी काँग्रेसला किती जगनवर विजय मिळेल याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर सुद्धा भाष्य केलं आहे.

प्रशांत किशोर म्हणाले, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांच्या संख्येत फार मोठा असा बदल होण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. देशात मोठा राजकीय बदल करायचा असेल तर काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे, मात्र आजच्या परिस्थिती काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नाही. काँग्रेसच्या जागांची संख्या 50-55 झाली तरी देशाचे राजकारण बदलणार नाही असं स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी (Prashant Kishor Prediction 2024 Election) व्यक्त केलं.

भाजपही 370 पार करणार नाही – Prashant Kishor Prediction 2024 Election

यावेळी प्रशांत किशोर यांना भाजपच्या लोकसभा जागांविषयी विचारलं असताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष (भाजप) या निवडणुकीत 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही, परंतु यावेळी पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकते. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे, मात्र जनतेने ते खरे मानू नये… खरं तर प्रत्येक नेत्याला त्यांचे ध्येय निश्चित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भाजपने जर 370 जागा जिंकल्या तर चांगले आहे, परंतु जर त्यांना यात अपयश आलं तर त्यांनी आपली चूक सुद्धा मान्य करायला हवी असं प्रशांत किशोर यांनी म्हंटल.